सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत असताना सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराड येथे आता रशियाने निर्मिती केलेली स्पुटनिक व्ही लस देखील उपलब्ध झाली आहे. याशिवाय कोविशिल्ड लस देखील उपलब्ध आहे. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यावधी ठिकाण असल्यामुळे साताऱ्याबरोबरच बरोबरच सांगली व रत्नागिरी, या जिल्ह्यांमधील नागरीकांनादेखील स्पुटनिक-व्ही लस घेणे शक्य होणार आहे.
अधिक माहिती देताना सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे व्यवस्थापक डॉ.व्यंकटेश मुळे म्हणाले की,” सह्याद्री हॉस्पिटलने महामारीच्या काळात प्रशासनाची साथ देत महत्वाची भूमिका बजावली आहे.१00 बेडच्या कोविड विभागाद्वारे अनेक रूग्णांवर उपचार केले गेले व यापुढेही ते चालू आहेत. त्याशिवाय आता सध्याची तातडीची गरज लक्षात घेता, सह्याद्री हॉस्पिटलने व्यापक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान 2000 डोसेस तर 24 मे ते 8 जुलै दरम्यान 18000 डोसेससह एकूण 20,000 हुन अधिक लोकांचे लसीकरण केले आहे. या लसीकरणादरम्यान 19 कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 6000 डोसेस देण्यात आले आहेत. दररोज साधारण 700 लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. हा वेग वाढविण्यासाठी व लसीकरण मोहिम अधिक व्यापक करण्यासाठी आता कोविशिल्डसह स्पुटनिक- लस देखील उपलब्ध आहे. लसीकरणाविषयी कोणतीही भीती न बाळगता महामारीवर मात करण्यासाठी सर्वांनीच पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे असे आम्ही आवाहन करतो. सर्व कंपन्या व संस्थांना देखील त्यांच्या कर्मचार्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी आम्ही सेवा देण्यास सज्ज आहोत.”
डॉ.व्यंकटेश मुळे पुढे म्हणाले की, सह्याद्री हॉस्पिटल नेहमीच पुणे-मुंबई च्या बरोबरीने कराडमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्यात अग्रेसर असते त्यामुळेच आम्ही अत्याधुनिक स्पुटनिक व्ही लस सुद्धा लोकांच्या सेवेसाठी कराडमध्ये उपलब्ध केली आहे. स्पुटनिकव्ही लस गमालिया रिसर्च इन्स्टिटयूट ऑफ एपिडेमॉलॉजि अँड मायक्रोबायोलॉजी , मॉस्को, रशिया येथे बनवली गेली असून भारतामध्ये याचे उत्पादन डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज हि कंपनी करीत आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय व विशेषतः लसीकरणावर भर दिला पाहिजे. सह्याद्री हे सातारा जिल्ह्यातील एकमेव कॉर्पोरेट हॉस्पिटल असल्याने, आमची नैतिक जबाबदारी समजून आम्ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.गेल्या दीड महिन्यामध्ये सह्याद्रीने 18,000 हुन अधिक लोकांना लस दिली आहे. इथून पुढे दररोज 1,000 लोकांना म्हणजेच महिन्याला 30,000 लोकांना लस देण्याचा आमचा मानस आहे व त्या प्रमाणामध्ये आम्ही लस उपलब्ध करीत आहोत”
” www.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर आधार नंबरची नोंदणी करून लसीसाठी अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे. दररोज सकाळी 8:00 वाजता स्पुटनिक-व्ही लसीचे डोस पोर्टलवर उपलब्ध करण्यात येतील व सकाळी 10 :00 नंतर लस देण्यात येईल. २१ दिवसांच्या अंतराने स्पुटनिक-व्ही लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच स्पुटनिक-व्ही लस रुपये 1145 ला तर कोविशिल्ड लस रूपये 780 ला उपलब्ध आहे.” अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर विश्वजित डुबल यांनी दिली.लसीकरणाबाबात अधिक माहितीसाठी सह्याद्री हॉस्पिटलशी संपर्क करावा – (02164 ) 661800 / 9673338251
You must be logged in to post a comment.