सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सचिन तेंडूलकरला शेतीतील कळत नाही. तर शरद पवारांना केव्हापासून क्रिकेट कळायला लागले. त्यांनी कधी बॅटिंग, बॉलिंग केली नाही. तरी ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले ना, अशी टिका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.
शेतकरी आंदोलनाबाबत सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केल्याने सचिन तेंडूलकरवर टिका होऊ लागली. त्या वेळी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना ज्यांना ज्या क्षेत्रातील माहिती नसते. त्याबद्दल बोलू नये, असा सचिनला सल्ला दिला.
यावर आज भाजपचे आमदार सदाभाऊ खोत सातारा येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत क्रांतीचे शंकर शिंदे, प्रकाश साबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
खोत म्हणाले, शरद पवार कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहे. पण त्यांना कधी कुस्ती खेळताना कधी बघितले नाही. त्यांनी फडात जाऊन किती कुस्त्या खेळल्या हे सांगावं. तुम्हाला तिथं काय समजला म्हणून तुम्ही तिथे गेला. त्यामुळे चित भी मेरा आणि फड भी मेरा असं चालणार नाही.
You must be logged in to post a comment.