सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पॅनेलला सहकार्य केले त्यांचेही आभार मानण्यात आले.ना. पाटील, आ. शिवेंद्रराजे, आ. मकरंद पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. जेष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी आभार मानले.
मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, किरण साबळे पाटील, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अरविंद जाधव, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, आशुतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, रामभाऊ जगदाळे, विक्रम पवार, सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, दादासाहेब बडदरे यांच्यासह सातारा तालुक्यातील सर्व मतदार, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.