साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त गुणवंत कामगार पुरस्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी व सातारा नगरपरिषद, साताराचा १६९ व्या वर्धापनदिनानिमित्ताने सातारा नगरपरिषदेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, शाखा नगरपरिषद, सातारा व शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, सातारच्या वतीने गुणवंत कर्मचारी-अधिकारी पुरस्कार सातारा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी लेखाधिकारी आरती नांगरे, बांधकाम विभाग प्रमुख दिलीप चिद्रे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे उपस्थित होते.

यावेळी प्रशांत गंजीवाले (आरोग्य निरीक्षक), हिम्मत पाटील (लेखा विभाग), सुधीर चव्हाण (बांधकाम अभियंता), देविदास चव्हाण (भांडार विभाग), संजय घाडगे (पाणीपुरवठा), दिनेश गांगुर्डे (जन्म मृत्यू विभाग), राहुल वायदंडे (नागरी सुविधा केंद्र), संदीप कांबळे, (नागरी सुविधा केंद्र), रत्ना सोनावले (आरोग्य,कंत्राटी कामगार), निखिल गायकवाड (शिपाई, हद्दवाढ विभाग) यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

   

error: Content is protected !!