Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातारा
सकाळी नऊ ते दोन या वेळेत कोरोना होत नाही का? : खा. उदयनराजे
सातारा
सकाळी नऊ ते दोन या वेळेत कोरोना होत नाही का? : खा. उदयनराजे
26th July 2020
प्रतिनिधी
जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ‘कोविड टास्क फोर्स’ स्थापित करण्यासह अनेक उपाययोजना राबवाव्यात,’ अशा सूचना खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या. दरम्यान, सकाळी नऊ ते दोन यावेळेत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. त्यावेळी कोरोना होत नाही का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली. या महामारीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही उपाययोजना सांगून त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या.
यावेळी सातारा जिल्ह्याकरिता ‘कोविड टास्क फोर्स’ स्थापित करावा, एफसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे, शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे, कोणतीही लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना, घरच्या घरी उपचार घेणे कामी प्रोत्साहीत करणे, शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडीसिन असलेल्या फिजीशियन्सची चांगल्या प्रमाणात प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे, सर्वसाधारण रुग्णालय फक्त कोविडच्या रुग्णांसाठी समर्पित करणे, अन्य रोगांचे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे, डब्नुयुआयडी टास्क फोर्स समितीने सुचवल्याप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत धोरण ठरवणे, सर्वसाधारण रुग्णालयांच्या कोविड सोडून इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करुन तो पर्याय राबवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना केल्या.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
लॉकडाऊन… अनलॉक… शिथिलता… पण कोरोनासंकट जैसे थे !
लॉकडाऊन की ‘लोकडाऊन’?
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.