सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल : आ. श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, (भुमिशिल्प वृत्तसेवा) : शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा येथे सामर्थ्य सोशल फौंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेला मिळालेले प्रमाणपत्र आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सामर्थ्य सोशल फौंडेशनचे अध्यक्ष ऍड गणेश चोरगे यांनी संस्थेची उद्दिष्टे, कार्ये व पदाधिकारी याबाबत माहिती दिली.

      आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन हे सामर्थ्य सोशल फौंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.  त्याचप्रमाणे संस्थेने विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी कामे करावी, यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले जाईल.  यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष ऍड गणेश चोरगे, विक्रम फडतरे, प्रणव पवार, स्वप्नील नलावडे, आरिफ शेख, अमर जगताप, वैभव चंदनशिवे उपस्थित होते.
error: Content is protected !!