सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी देण्याच्या मुद्यावरुन आणि बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप सरकारने केल्याची टीका संभाजी भिडे यांनी कराड येथे केली.
बंडातात्या कराडकर यांनी वारीसंदर्भात भूमिका घेतल्यानंतर स्थानबध्द कारवाईच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. वारीचा मुक्काम जिथं जिथं होतो, त्या त्या गावात परिसरातील लोकांनी येऊन एकत्र मुक्काम करावा, असं आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. पोलीस अडवतील पण विरोध मोडून काढा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले.
जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात बंडातात्या कराडकर यांच्या वरील कारवाईच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात धारकरी मोर्चात सहभागी झाले होते.
You must be logged in to post a comment.