संदीपभाऊ शिंदे यांना डाॅक्टरेट पदवी बहाल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे यांना रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.मधुसूदन,आयोजक पवनकुमार भूत व भारताचे रिप्रेझेंटेटिव्ह डॉ. दिनेश गुप्ता यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.

रिपाईचे नेते किशोरभाऊ तपासे यांची प्रेरणा घेऊन जय-भीम फेस्टिवलच्या माध्यमातून समाज घडवण्याचे काम संदीप शिंदे करत आहेत. रिपाई नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा ध्यास हाती घेतला आहे. स्वछता मोहीम राबवत असताना लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ह्या हेतूने शौचालये व गटारे सुद्धा स्वतः साफ केली आहेत. त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ हाती घेऊन अनेकांना व्यसनमुक्त केले आहे. तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोंडवेत सार्वत्रिक वाचनालयाची सुरवात केली. तसेच गेली 13 वर्षापासून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा राबविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवी बहाल केली आहे. याबद्दल संदीप शिंदे यांचे खासदार उदयनराजे भोसले,आमदार महेश शिंदे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!