संगम माहुलीत राहुल शिवनामे किंगमेकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा तालुक्यातील संगम माहुली ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तिर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनलने ९ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुलजी शिवनामे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने स्वच्छ सुंदर संगम माहुली, स्वप्न नव्हे ध्येय” हा विचार घेऊन निवडणूक लढवित असताना प्रवीण शिंदे, अविनाश कोळपे, प्रकाश माने, हेमलता पडवळ, साधना सावंत हे सदस्य निवडून आले.

यावेळी बोलताना राहुल शिवनामे म्हणाले, आगामी काळात गावाच्या विकासासाठी झोकून देवून कार्य करणार आहे.संगम माहुली तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार आहे , त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या रस्ते विकासाच्या योजना प्रभावीपणे आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती ग्रामस्थांना देऊन संगम माहुली आत्मनिर्भर करण्यासाठी काम करणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व सर्व मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी सतत कार्यरत राहणार असून, गावात पेयजल योजना, डिजिटल गाव आणि वाचनालय, स्मशान भूमी साठी पार्किंग,महिला बचतगट सक्षमीकरण,स्ट्रीट लाईट, ग्रामपंचायत आणि मागास वस्तीमध्ये हायमॅक्स,उर्वरित बंदिस्त गटार योजना,बागबगीचा आणि नानांनानीं पार्क , सीसी टीव्ही, कचरा व्यवस्थापन साठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या घंटागाड्या, मागासवर्गीयांसाठी समाजमंदिर ही कामे पूर्ण करणार आहे. त्यासाठी गावाच्या विकास कार्यात अधिकाधिक युवकांना सामावून घेणार आहे , असेही राहुल शिवनामे यांनी सांगितले

error: Content is protected !!