सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा अशा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कण्हेर, उरमोडी, कोयना धरण पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्याने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी गुरुवारी पाण्याखाली गेली.
संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत सातारा शहर, उपनगर आणि परिसरातील गावांमधील मृतांवर अत्यंसंस्कार केले जातात. तसेच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाºया रुग्णांवरही कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या दीड वर्षांत चार हजारांहून अधिक कोरोना मृतांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही या स्मशानभूमीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कैलास स्मशानभूमीतील चौदा अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच स्मशानभूमी जवळ मृतदेह जाळण्यासाठी ठेवलेले लाकूडही पूराच्या पाण्यात वाहून गेले आहे.
You must be logged in to post a comment.