सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ज्येष्ठ अर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजोग कदम यांना पुणे परिमंडळ आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या अखत्यारित पुणे, सातारा, सोलापूर हे तीन जिल्हे असणार आहेत.
डॉ. संजोग कदम हे गेली ३२ वर्षे जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्थोेपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक रुग्णांवर किचकट शस्त्रक्रियाही केल्या. त्यांच्या पाठीशी प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांना गत वर्षी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून तीन महिने संधी मिळाली होती. या काळातही त्यांनी सिव्हिलमध्ये रखडलेल्या शस्त्रक्रिया केल्या. गेल्या काही महिन्यांपासून उपसंचालक पदाच्या ज्येष्ठ सूचीमध्ये त्यांचे नाव समाविष्ठ होते. त्यामुळे सोमवारी राज्य शासनाने त्यांची पुणे येथे उपसंचालक म्हणून पदोन्नती केली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या पदोन्नतीमुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयातील रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
You must be logged in to post a comment.