सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत लोणंद जि.सातारा येथील संतोष ह.राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
नुकतेच नेहरु सेंटर वरळी, मुंबई येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर हे पुरस्कार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री, जयंत पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे प्रथम पारितोषिकाचे स्वरुप होते. हे पारितोषिक राजेंद्र बाबुराव उगले (नाशिक),गणेश महादेव औरंगे (श्रीगोंदा) , संतोष हरिदास राऊत (लोणंद सातारा) यांना विभागुन देण्यात आले.
तर द्वितीय ७ हजाराचे पारितोषिक स्वप्नील गोसावी (बार्शी),शिरीष देशमुख (जालना),वीणा बाविस्कर (जळगाव), यांना विभागुन देण्यात आले. तर तृतीय ५ हजाराचे पारितोषिक विष्णू संकपाळ (औरंगाबाद),जयश्री औताडे (गंगाखेड), अलका वढावकर (ठाणे) यांना विभागुन देण्यात आले.तर उत्तेजनार्थ २५ जणांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र पोस्टाने घरपोच पाठविण्यात आले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ” कवितेतून निवेदन ” या विषयावरील राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेसाठी राज्यभरातून ६८८ कवी सहभागी झाले होते. राज्य व केंद्र सरकारला जाग यावी यासाठी हा अनोखा उपक्रम राबाविला असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, मुख्य संयोजक संदीप राक्षे, नंदकुमार बंड,डाँ.ललित अधाने, अच्युत कुलकर्णी विवेक थिटे,सुशील बोराडे, डाँ.सुशील गावंडे, नितीन गावंडे, यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.