सातारा शहर आणि लगतचा परिसर लोडशेडिंगमुक्त होणार : खा. उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथील जागेत २० मेगावॅट विज निर्मितीचे उपकेंद्र मंजुर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातुन पाच कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या कामाची लवकरच सुरवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंगमुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

सातारा शहराच्या विकासासाठी धोरणात्मक पाऊले उचलण्याचे संकेत इनोव्हेटीव सातारा या माध्यमातुन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले होते. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अमंलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोडशेडींगची समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नामुळे महावितरणने सातारा आणि ग्रामीण भागासाठी २० मेगावॅटचे विजनिर्मिती करणारे उपकेंद्र मंजुर केले आहे.

सातारा नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे विज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात २० मेगा वॅट उपकेंद्रासाठी १५ गुंठे जागा देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या उपकेंद्राच्या निर्मितीमुळे सातारा शहर आणि परिसर येथील पुढील २५ वर्षासाठी विजेची समस्या सुटणार आहे.

error: Content is protected !!