सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराचा समतोल विकास साधण्यास, सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहीली आहे. विकासामध्ये दुजाभाव न करता, आवश्यक कामात सातत्य ठेवून, नागरीकांचे हित जोपासत, विकास पर्व उभे करणारी, सातारा विकास आघाडी ही नागरीकांची आघाडी आहे, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
प्रभाग क्रमांक २० येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अॅड.डि.जी.बनकर, नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत, माजी नगरसेवक अशोक शेडगे, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन, गेल्या काही वर्षात अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लागली आहेत. जेथे गरज आहे तेथे कामांना प्राधान्य देत नागरीकांचे हिताला सर्वोच्य प्राधान्य दिले गेले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नामधुन सुमारे ५० ते ५५ लाखांच्या कामांचा शुभारंभ होत आहे ही समाधानाची बाब आहे.
महात्मा गांधी क्रीडा मंडळ लगत ओढयास संरक्षक भिंत बांधणे, चैतन्य कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, माजी नगरसेवक कै.जगन्नाथ चौगुले बंगला ते नंदादिप अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे, ठक्कर कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण करणे, इत्यादी कामांचा शुभारंभ उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
प्रारंभी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी प्रभागाच्या वतीने स्वागत केले यावेळी अस्लमभाई बागवान, रियाजभाई बागवान, चैतन्य कॉलनी येथील श्री.पोरेसाहेब, सुशांत मोरे, बाळासाहेब चौगुले, ठक्कर कॉलनीमधील रामचंद्र पाटील सर, प्रकाश जाधव सर, किरण कदम,मिलींद चिपळुणकर, महात्मा गांधी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रदिपराव गोळे, अमर गोळे, मंगेश गोगावले, साई सावंत, यांचेसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
त्याचप्रमाणे गांधी क्रीडा मंडळास सदिच्छा भेट देवून, मंडळाच्या इमारतीची व अन्य सोयी सुविधांबाबत संबंधीतांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मंडळास लागेल ते सहकार्य आम्ही करु असा शब्द दिला.
You must be logged in to post a comment.