सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रीय महामार्गावर परराज्यातील ट्रक थांबवुन जबरदस्तीने वाहन चालकाना लुटणा-या आरोपींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
याबाबत माहिती अशी कि, दि. २५ रोजी रात्रौ १.३० वा.सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वाढे फाटा,सातारा येथे उड्डाणपुलावर फिर्यादीचा ट्रक अचानक बंद पडला असल्यामुळे चालक व त्याचा मित्र हे ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. रात्रौ ०१.३० वा.सुमारास अचानक तीन अनोळखी इसमांनी ट्रकचे दोन्ही दरवाजे उघडुन चालक, किन्नर यांना दमदाटी करुन त्यांचेकडे पैशाची मागणी करु लागले त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता त्यातील एकाने फिर्यादी यांचे डोक्यात दगड घातला, फिर्यादीस जबर दुखापत करुन त्यांचे ट्रक मधील २००००/-रुपये रोख रक्कम जबरी चोरी करुन चोरुन मोटर सायकलवरुन पळुन गेले.
चालक यांनी दिले तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाणेस जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीमधील आरोपींचे वर्णनावरुन संशयीत इसमांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाबत सातारा शहर पो. ठाणेचे पोलीस निरीक्षक मांजरे यांनी सातारा शहर पो. ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन आरोपींना अटक करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकाने घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे व गोपनीय बातमीदारांकडुन प्राप्त माहीतीच्या आधारे तीन संशयीत इसमांना सातारा शहर परिसरातुन ताब्यात घेतले सुरवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या तीन संशयीतांपैकी दोन आरोपी असुन एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.सदरचा गुन्हा घडल्यापासुन काही तासातच सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.एस.कदम हे करीत आहेत. सदर कारवाईमध्ये पो.ना. अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे,जोतीराम पवार, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे,गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला आहे.
You must be logged in to post a comment.