सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा): गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील ५० जणांची यादी तयार केली असून, त्यांना गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत सातारा शहरातून हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंड व ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, अशा लोकांची यादी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी काढली होती. यामध्ये तब्बल ५० जण हद्दपारीच्या प्रस्तावामध्ये बसत असल्याचे समोर आले. त्यानंतर शहर पोलिसांनी अशा ५० जणांना १० दिवसांसाठी सातारा शहरातून हद्दपार केले. जर या १० दिवसांत हद्दपार केलेले लोक शहरात पोलिसांना आढळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.