बँको पुरस्काराने उत्कृष्ट बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा सन्मान !

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनिय संस्था बँकोने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ठ कामकाज, संपादन केलेले उज्वल यश आणि भारतामधील बँकिंग सेवेमध्ये विकास व उन्नती करणेचेदृष्टीने असलेले कामकाज व योगदान या बाबींमुळे तसेच रुपये ६००० कोटीवरील ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेची ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कारासाठी निवड झाली.

बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, विक्रमसिंह पाटणकर, श्री. दत्तात्रय ढमाळ, श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. नितीन पाटील, श्री. शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, श्री. राजेश पाटील-वाठारकर, श्री. प्रदिप विधाते, श्री. प्रकाश बडेकर, श्री. अर्जुनराव खाडे, सौ. सुरेखा पाटील, सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे व विविध विभागांचे अधिकारी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते. दरवर्षी सातारा जिल्हा बँक बँको पुरस्कार मिळवीत आहे.

error: Content is protected !!