जिल्हा बँकेवर नितीनकाका आणि अनिलभाऊंचे राज्य

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच सुरु होती. बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. त्याचवेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनीही अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू केले होते. तसेच नितीन पाटील आणि राजेश राजपुरे हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळं या निवडीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं.

आज सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली

error: Content is protected !!