सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा जिल्ह्यातील सर्व सहा नगरपंचायतींचे निकाल हाती आले असून जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलं आहे. सहापैकी चार नगरपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. मात्र जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाचा राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांनी पराभव केला. तर कोरेगाव शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला आहे.
कोरेगाव नगरपंचायतिच्या १७ जागांपैकी १३ जागा शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलला आणि ४ जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झालं आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता मिळाली.
पाटण नगरपंचायतमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेृत्ववाखालील शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला १५ मिळाल्या आहेत.
लोणंद आणि खंडाळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे वर्चस्व राहिले आहेत.
दहिवडीत भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांनी विजयी खेचून आणला आहे. राष्ट्रवादी ८, भाजप – ५, शिवसेना – ३, अपक्ष – १ असे बळाबळ आहे.
वडुज नगरपंचायतीत भाजपने काठावर बहुमत मिळवलं आहे. भाजपला ६, राष्ट्रवादीला ५, अपक्ष – ४,कांग्रेस – १, वंचित – १ मात्र अपक्ष ४ उमेदवार निवडून आल्याने सत्ता कोण स्थापन करणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
You must be logged in to post a comment.