सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असताना दुसरीकडे मात्र लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सातारासह राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलीय. सातारासह राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरुन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परतावं लागल्याचा प्रकार घडला.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व खासगी रुग्णालयात १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली. एका आठवड्यात ९० हजार १३६ जणांना लसीकरण करण्यात आले. आजअखेर जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ४३४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. नागरिकांचा लसीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील लसीचा स्टाॅक संपल्याने लसी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली.
राज्यात फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करावी लागली.
You must be logged in to post a comment.