झाड पडल्याने लोणंद रस्त्यावरील वाहतूक ठप्प

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-लोणंद/फलटण रस्त्यावर आरळे, ता. सातारा हद्दीत बाभळीचे झाड पडल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती.

सातारा लोणंद मार्गावर आज सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरळे गावाजवळ जुने बाभळी चे झाड पडल्याने या रस्त्यावरील वहातुक दोन तास विस्कळीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने झाड हटविण्यात आले. मात्र, झाड हटवण्यापूर्वी जवळजवळ रस्ताच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर पर्यत वहातुक उन्हात उभी असल्याने प्रवाशी घामाघूम झाले

error: Content is protected !!