सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी रिपाई (ए) तर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
रिपाइंने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी निदर्शने केली आहेत. याबरोबरच रेशनिंग वितरण करणाऱ्या वाहनांना जीपीआरएस अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात यावी. कऱ्हाड येथील भेदा चौकाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करून अर्धाकृती पुतळा बसवावा. अन्न,धान्य व खाद्यतेल यांच्यावरील कर रद्द करण्यात यावा. सामाजिक न्याय भवनांचे ऑडिट तात्काळ करण्यात यावे. मागासवर्गीय समाजातील भूमिहीन नागरिकांना आधार देणारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या आंदोलनप्रसंगी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, किरण ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, जयवंत कांबळे, संगीत शिंदे, सविता सकपाळ, पवन धायगुडे, रामभाऊ मदाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.