सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील मेडीकल कॉलेजला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपाइं (A) यांच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या सूचनेनुसार कराड रिपाइं पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी खासदार श्रीनिवास पाटील व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कराड तालुकाध्यक्ष मुकुंद माने, कराड शहराध्यक्ष संजय कांबळे व मलकापूर शहराध्यक्ष रामचंद्र खिलारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य झाले आहे. आज जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून घेतले जाते. त्यामुळे सातारा येथे तयार होणाऱ्या मेडीकल कॉलेजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
You must be logged in to post a comment.