सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेसाठी शासनाने मान्यता देऊन तीन वर्षांकरिता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हस्तांतर करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून द्यकीय महाविद्यालय सुरु करणेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद यांचेकडून महाविद्यालयाची पाहणी होणार आहे. या पाहणीसाठी तातडीने उपकरणांची उपलब्धता करणे आवश्यक असलेने त्या करिता सातारा जिल्हा बँकेने मेडिकल कॉलेजसाठी मदत करणेचा निर्णय घेऊन रक्कम रु. १५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांचेकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुपूर्त केला.
यावेळी संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, विक्रमसिंह पाटणकर (माजी आमदार),दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील,. शिवरूपराजे निंबाळकर, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, संचालिका सुरेखा पाटील तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळक म्हणाले, सातारा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यलय सुरु होत असलेने जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकांना उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहरांमध्ये जाणेची आवश्यकता राहणार नाही. त्याबरोबरच जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची फार मोठी संधी उपलब्ध होत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रगण्य बँक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकीही जपत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने ज्या वेळी देशात किंवा राज्यात नैसर्गिक आपत्ती आली आहे त्या वेळी सर्वोतोपरी विविधरुपाने मदत केली आहे.
You must be logged in to post a comment.