सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजसाठीची जागा हस्तांतरण, १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळासी होती. त्यानंतर आता सातारच्या मेडिकल कॉलेजसाठी अधिष्ठाता, प्राध्यापक आदी एकूण ५१० पदांची निश्चिती करण्यात आली असून हि पदे भरण्यास राज्य शासने मान्यता दिली आहे. लवकरच हि पदे भरली जाणार असून मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे.
गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवला. त्यावेळी वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व अनुषांगिकबांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली. त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली होती.
दरम्यान, मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असणारी पद निर्मिती करावी आणि ही सर्व पदे भरून प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज सुरु करावे अशी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्ष कॉलेज सुरु होण्यासाठी आवश्यक पदांची निश्चिती आणि ती भरण्यासाठी मान्यता मिळणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार विविध संवर्गातील ५१० पदे निर्माण करण्यास तसेच पदनिर्मिती, यंत्रसामग्री, उपकरणे, आवर्ती खर्च, बाह्यस्त्रोत खर्च व नव्याने अनुषंगिक शैक्षणिक रुग्णालय निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चास निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ अधिष्ठाता, ५ प्राध्यापक, १४ सहयोगी प्राध्यापक, १ मुख्य प्रशासकीय अधिकारी, १८ सहायक प्रशासकीय अधिकारी, ग्रांथपाल आदी आवश्यक सर्व प्रकारची एकूण ५१० पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे.
You must be logged in to post a comment.