सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा मेडिकल कॉलेजसाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या अनुशंगाने राज्य शासनाने सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पहाणी दौरा व अंतिम परवानगी अजून प्रलंबित आहे. अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात साकारत असलेल्या पहिल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४९५ कोटीचा भरीव निधी व ६२ एकर जमिन उपलब्ध करून दिल्याने येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेजची भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहिल. मात्र तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र प्रत्यक्ष सुरू व्हावे यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या वर्गखोल्या, लॅबोरेटरी, वाचनालय, शिक्षक व त्यांची राहण्याची व्यवस्था आणि अन्य सोयी पुरवण्यात आल्या आहेत. यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या अनुशंगाने राज्य शासनाने सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पहाणी दौरा व अंतिम परवानगी अजून प्रलंबित आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरीत व्हावी यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाकडून हा पाहणी दौरा लवकरात लवकर करावा व आवश्यक असणारी परवानगी तातडीने द्यावी अशी मागणी त्यांच्याकडे यावेळी केली
You must be logged in to post a comment.