सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सातारा नगरपालिकेची हद्दवाढ नुकतीच झाली करण्यात आली. त्यामुळे सातारा शहराच्या लगत असलेले विलासपूर, शाहूनगर (गोडोली), खेड (पीरवाडी), शाहूपुरी, दरे खुर्द, तामजाईनगर, करंजे, दौलतनगर आदी भागांचा नगरपालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या एकूण नगरसेवकांमध्ये आता सात नगरसेवकांची भर पडणार आहे.
सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी राजपत्र प्रसिध्द केले आहे. त्यानुसार शहराची हद्दवाढ झाल्याने नवीन ७ वाॅर्डची तयार झाले आहेत. यामध्ये दरे खुर्द, तामजाईनगर, करंजे, दौलतनगर भागातून चार नगरसेवक व विलासपूर, शाहूनगर (गोडोली), खेड (पीरवाडी) या भागातून तीन नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. यातील चार वाॅर्ड महिलांसाठी राखीव तर तीन खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.
सध्या सातारा नगरपालिकेत ४० नगरसेवकांची संख्या आहे. त्यामध्ये हद्दवाढीमुळे आणखी ७ नगरसेवकांची भर पडली आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेत एकूण ४७ नगरसेवक असणार आहेत. यासाठी सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना यांनी गटबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
You must be logged in to post a comment.