सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा नगरपरिषदच्या प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी/बांधकाम शुभारंभ लवकरच करणार. तसेच हद्दवाढीच्याही भागातील अत्यावश्यक कामे सुरु करणार, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी नगरपरिषदेच्या नावे नाममात्र १ रुपयांच्या मोबदल्यात प्रदान कालेल्या जागेवर, नगरपरिषदेची भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने विशेष बाब प्रशासकीय इमारतीकरीता भरीव निधी मंजूर करावा. नगरपरिषदेच्या झालेल्या हद्दवाढीच्या चौफेर विकासाकरीता अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिदे यांचेकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे ना. एकनाथ शिंदे यांचेसमवेत विविध विषयावर सुमारे २ तास झालेल्या सदिच्छा भेटीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.सातारा नगरपरिषदेला पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी अत्यंत उदार अंतःकरणाने एक रुपया नाममात्र किंमतीमध्ये सुमारे ४० गुठे जागा नगरपरिषदेच्या नावावर करुन दिली आहे. आजच्या युगात देखिल मातृसंस्थेकरीताअसे कोट्यवधी रुपयांची जागा देतात हे समस्त सातारकरांचे भाग्य आहे. सदरची जागा आत्ताच्या हद्दवाढ झालेल्या भागासह सातारा शहराच्या मध्यवर्ती आहे. या जागेत नगरपरिषदेची सुसज्य अशी मुल्य प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुण्याचे आर्किटेक्ट श्री.भंडारी यांनी तयार केलेले आराखडे याकरीता नेमलेल्या ज्युरी पॅनलद्वारे निवडण्यात आलेले आहेत. सुसज्य विविध पदाधिकारी दालने, कॉन्फरन्स हॉल, व्हि.सी. हॉल, नगरपरिषदेचे अद्यावत सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी उपहारगृह, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, यासह विविध सुविधा सह बहुमजली इमारत उभी करण्यात येणार आहेत. त्याकरीता ६० कोटींपेक्षा जास्त रक्कम अंदाजित करण्यात आलेली आहे. तसेच सातारा नगरपरिषदेची नुकतीच हद्दवाढ झालेली असलेने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागामध्ये विकास कामे करणे करीता अधिकचा अतिरीक्त निधी सातारा नगरपरिषदेला उपलब्ध करुन द्यावा जेणेकरून नव्याने समाविष्ठ झालेल्या भागाचा चौफेर विकास करता येईल.
हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाकरीता सुमारे १७ कोटींचा निधी लवकरच प्रदान करण्यात येईल तसेच प्रशासकीय इमारत होण्याची गरज विचारात घेवून नगरविकास विभागाकडून, प्रथम रुपये १० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी ना.एकनाथ शिंदे यांनी दिले. लवकरच प्रशासकीय इमारतीची पायाभरणी आणि हद्दवाढ भागातील अत्यावश्यक व गरजेच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल.
You must be logged in to post a comment.