सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा पालिका ही गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचे कुरण झाले होते. तेथे चरायचं आणि खिसे भरायचे हेच काम त्यांच्या नगरसेवकांचे चालले होते. आता पराभव दिसू लागल्याने इनोव्हेटिव्ह साताऱ्याची योजना उदयनराजेंनी आणली आहे. त्याची मुदत पालिका निवडणूकीसोबतच संपणार आहे. चार, सहा महिन्याची ही योजना पुन्हा गुंडाळली जाईल, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”सातारा पालिकेचे गेल्या पाच वर्षाचे कामकाज सातारकरांनी बघितले आहे. विरोधकांनी आरोप करण्याऐवजी सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक एकमेकांविरोधात बोलत भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आता शेवटच्या टप्प्यात उदयनराजेंनी इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना आणली आहे. निवडणूक जवळ आली की अब्जावधी रूपये सातारच्या विकासासाठी यायला लागले आहेत. हे पैसे पेपरमधूनच येणार आणि पेपरमधूनच परत जाणार आहेत.”
इकडून योजना आणली, तिकडून योजना आणली व भेटींचे जे फोटो सेशन चालू आहे. याची मुदत पालिकेची निवडणूक आहे. निवडणूक झाली की उदयनराजेच्या इनोव्हेटिव्ह साताऱ्याची मुदत संपतेय. तेवढ्यापुरती चार, सहा महिन्याची ही योजना असून ती गुंडाळली जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षे शाश्वत विकास करणाऱ्याच्या मागे सातारकरांनी उभे राहावे,” असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.