सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहरासह हद्दवाढ भागातील रस्ते, गटारे यांची कामेही प्रधान्याने मार्गी लावण्यात येणार आहेत. वीज बचतीसाठी जकातवाडी फिल्टर प्लॅट आणि शहापूर पंपिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे. गोडोली तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासह शिवतीर्थासाठी निधी उपलब्ध झाल्याने रखडलेले सुशोभिकरणाचे सर्व काम गतीने मार्गी लावण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या सभेत घेण्यात आला.
सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी पार पडली. सभेसमोर १८४ विषय चर्चेसाठी घेण्यात आले होते.गोडोलीतील केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोडोली तळ्याचे पुनरुज्जीवन करुन त्याठिकाणी तळ्यासाठी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे गोडोली नाका परिसराचा लूक बदलणार असून विकासात भरपडणार आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवतीर्थासाठीही निधी मिळाल्याने काम गतीने करण्यात येणार आहे.सुशोभिकरणासह हे काम करण्यात येणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर पालिकेकडून गुरुवार परजची जागा विकसित करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील लोकांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
जकातवाडी फिल्टर प्लॅट आणिशहापूर पंपिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत होणार असून नगरपालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला नागरी वस्तीत येणाऱ्या रस्त्यावरील पहिल्या चौकास छत्रपती शाहू महाराज चौक असे नामकरण करण्यात येणार आहे.
शहराची हद्दवाढ झाल्यामुळे उपनगरांमध्ये नागरीकरणाचा वेग वाढला आहे.नव्याने विकसित होत असलेल्या भागात मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. तामजाईनगर या उपनगरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. विकास आराखड्यात समावेश असलेल्या या रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या योग्य पध्दतीने काम होणार असल्याने तामजाईनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.विकासावर भर देण्यात आला आहे. या भागात आरसीसी गटर, रस्ते, पथदिवे,संरक्षक भिंती, पाईपड्रेन काँक्रीटिकरण आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.
दरम्यान,विषयपत्रिकेवरील १८२ विषयांना मंजूरी देण्यात आली. एकच काम दोन वेळा प्रस्तावित झाल्याने दोन विषय रद्द करण्यात आले.सभेला नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अधिकारी शहाजी वठारे, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाशराठोड, भांडार विभाग प्रमुख प्रणवपवार, अंतर्गत लेखा परीक्षक कल्याणीभाटकर, लेखापाल हिंमत पाटील,विश्वास गोसावी, सतीश साखरे,श्रीकांत गोडसे, प्रशांत निकम, भालचंद्र डोंबे, अतुल दिसले उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.