सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – किल्ले अजिंक्यतारा सुशोभिकरण करणे या विषयाला सातारा नगरपालिकेच्या इतिहासातील पहिली किल्ले अजिंक्यताऱ्यावरील विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. ही सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली राजसदरेवर पार पडली.
ऐतिहासिक अशा सभेला सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. या सभेत सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी विषय वाचन केले. त्यानंतर शेखर मोरे-पाटील म्हणाले, किल्ले अजिंक्यताऱ्यावर येणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट सुरु करावी तसेच किल्यावर ओपन जीमही सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली.ऍड. दत्ता बनकर म्हणाले, अत्यंत चांगला असा दिवस आहे. विशेष सभेच्या नियोजनाची बैठक उदयन महाराजसाहेबांच्यासोबत झाली तेव्हा त्यांनी लगेच अनुमती दिली. अन् अजिंक्यतारा सुशोभित करण्याचा विषय घेण्यात आला. महाराष्ट्रातील नामांकित आर्किटेक्ट यांच्याकडून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. गडावरील तलावांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. गडावरील राजसदर असेल, मंदिरे असतील त्यांचेही नुतनीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यात समावेश करण्यात येणार आहे. आता हद्दवाढ झाल्यामुळे जबाबदारी आहे. सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण अजिंक्यतारा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू, आपल्या ताब्यात असलेली गार्डन आहे. तेथे काही लोक झाड तोडतात. फॉरेस्ट आणि आर्कोलॉजी विभागाला सहभागी करून घेऊ, डीपीआर तयार करू, अजिंक्यताऱयाच्या विकासासाठी सुरुवात आपण करु असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब ढेकणे म्हणाले, किल्याच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तो रस्ता अगोदर तयार करुन घेवू यात, अशी मागणी केली.
निशांत पाटील म्हणाले, आजचा ऐतिहासिक क्षण आहे. बऱ्याच सूचना झाल्या आहेत. सगळ्या सातरकरांची इच्छा आहे की अंजिक्यताऱयाच संवर्धन व्हाव ही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी फोटोच पुस्तकं पाहिलं होतं. त्यात अजिंक्यताऱयाचा चांगला फोटो त्यांनी काढलेला आहे. चांगल प्रेझेंटेशन त्यांच्यापुढे केलं तर निधी मिळेल. राजकारण न करता सर्वांनी एकत्र येवून फाटे न फोडता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर चांगले प्रेझेंटेशन केले तर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजिंक्यताऱयासाठी निधी देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, आज मला सभेविषयी सांगावं वाटत. ही ऐतिहासिक सभा घेतोय. सगळेजण नशीबवान आहेत. चार वर्षांपासून मी या उत्सवाला येतेय. येथे सभा घेण्याविषयी आम्हाला इच्छा होते. तांत्रिक अडचणी होत्या. आज विशेष सभा किल्यावर होत असून हा मोठा महाराष्ट्राचा गौरव आहे. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 60 लाखाची तरतूद केली होती पुढे वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी आश्वासन दिले.
You must be logged in to post a comment.