सातारा नगरपालिकेचे शाहूपुरीकडे दुर्लक्ष

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहूपुरी परिसर हा सातारा शहर हद्दीत समाविष्ट झाला असला तरी, ज्या पद्धतीने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नी लक्ष असायला पाहिजे. त्या पध्दतीने आरोग्य व स्वच्छतेविषयी दुर्लक्षझाल्याचे सध्याचे चित्र आहे. याप्रश्नी नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी आघाडीचे भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलम देशमुख, माधवी होटे, विकास देशमुख, सुरेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!