सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेच्या हद्दीमधील बिगर निवासी मिळकतधारकांना सन 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वार्षिक बिलापैकी 3 महिन्यांच्या मालमत्ता करामधुन सुट देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार सुट देण्यात प्रक्रीया सरु झाली आहे. कोरोनाच्या संकटात, नागरीकांच्या व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींचा तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात येवून, व्यावसायिकांना प्रामाणिकपणे दिलासा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात, शहराची मातृसंस्था म्हणून व्यावसायिकांच्या बिगर निवासी घरपट्टीमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीची भरघोस सुट देणारी सातारा नगरपरिषद ही बहुदा पहिलीच नगरपरिषद असाव असे नमुद करुन खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था ही त्या त्या शहराची मातृसंस्था म्हणूनच काम करत असते अशी आमची पहिल्यापासूनची धारणा आहे. जन्मापासून अखेरपर्यंत प्रत्येकाचा कोणत्याना कोणत्या कारणामुळे नगरपरिषदेचा सातत्याने संबंध येत असतो. अश्या वेळी नागरीकांची सहजशक्य कामे शक्य तितक्या लवकर आणि पारदर्शीपणाने होण्यासाठी सातारा विकास आघाडी नेहमीच आग्रही राहीलेली आहे.
सध्याच्या काळाचा विचार करता, सन 2005 मध्ये एकूण 782 इतका कर्मचारी वर्ग होता तो 2020 मध्ये शहराची लोकसंख्या जवळजवळ दुप्पट होवूनसुध्दा कर्मचारीवर्ग 440 इतका कमी झाला आहे. यामध्ये सुध्दा जवळजवळ 25 अधिकारी सेवक हे राज्यसंवर्ग सेवेमधुन आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक कर्मचा-याला आपल्या शहराविषयी जशी आत्मियता असते तशी आत्मियता बाहेरुन येणा-या संवर्ग सेवकाला असली पाहीजे हे शक्य होतेच असे नाही. सुदैवाने सातारा नगरपरिषदेमध्ये बाहेरुन आलेले अधिकारी हे चांगले काम करीत आहेत. यापार्श्वभुमीवर प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि धोरणात्म्क निर्णय घेणा-या लोकप्रतिनिधींची सांगड घालुन, जास्तीत जास्त नागरीकांना चांगल्या सोयी- सुविधा कश्या मिळतील हे आमचे प्रयत्न राहीलेले आहेत. त्याकरीता यांत्रिकीकरणावर भर देणे, जास्तीत जास्त निधी केंद्र व राज्यशासनाकडून उपलब्ध करुन घेणे, आदी उपाययोजना राबविल्या आहेत. त्यातुनच गेल्या वर्षभरापेक्षा जास्त् कालावधी लाटुन सुध्दा अजुनही कोरोना या संसर्गजन्य रोगाचे थैमान सुरु आहे.
लॉकडावून, अनलॉक, ब्रेक द चेन अश्या संकल्पना राबविताना, छोटया मोठया व्यावसायिकांसह सर्व व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेवून आम्ही शासनाकडे बिगर निवासी आणि निवासी मिळकतधारकांसह सर्वांच्या मिळकतींच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावाचा सुध्दा पाठपुरावा सुरु आहे. त्या प्रस्तावावर संवेदनशीलतेने निर्णय होणे अपेक्षीत आहे. निवासी मिळकतधारकांच्या बाबतीतही पण तोपर्यंत स्वस्थ न बसता, नगरपरिषदेच्या कायदयातील तरतुदींचा सकारात्म्कतेने अन्वय लावून, सन 2020-21 या आर्थिक वर्षातील एका तिमाहीचा बिगर निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची अंमलबजावणी सातारा नगरपरिषदेने सुरु केली आहे. याचा लाभ प्राथमिक माहीतीनुसार 6,697 बिगरनिवासी मिळकतधारकांना मिळणार आहे. , या बिगर निवासी मिळकतींचा एकूण सुमारे 71 लाख 57 हजार रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. केंद्राकडून अतिरिक्त् निधी मिळवणे आणि प्रशासकीय बचत या दोन मुख्य स्त्रोताव्दारे ही होणारी तुट भरुन काढण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
You must be logged in to post a comment.