सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगर पालिकेची सभा जवळपास सहा महिन्यांनी झाली. निवडणूकीपूर्वी शेवटच्या याऑनलाईन सर्वसाधारण सभेत घरपट्टी माफी गाळयांची निश्चिती, शहरात वाढलेली काढलर्ला अतिक्रमणे, कोरोना काळातील आरोग्य खरेदी या विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच राडा झाला.
या सभेत मंगळवार पेठेतील संरक्षक भिंतीचा विषय रद्द करण्यात आला तर सेनॉर चौकाचे नामकरणासह आरोग्य विषयाचे तीन असे चार विषय तहकूब करण्यात आले. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ५४ विषयांना मंजूरी दिली.
सातारा नगरपालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सुमारे चार तास चाललेल्या या सभेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर
जोरदार फायरिंग केले. शहरात मोती चौक व शिक्षक बँक कॉर्नर ते तहसीलदार कार्यालय येथे दिवसेंदिवस वाढलेली अतिक्रमणे नेमकी कोणाची ? त्याला कोणाचा आशिर्वाद आहे, मंडई लिपिकाचे नाव सांगून सर्रास पावत्या फाडल्या जातात असा हल्लाबोल नगरसेवक वसंत लेवे, धनंजय जांभळे व अशोक मोने यांनी केला. दरम्यान, या सभेतच मोती चौकात अतिक्रमण करणारी वडापाव हातगाडी जप्त करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
करोना काळातील अतितातडीच्या प्रस्तावाचा आरोप झाल्याने माजी पक्षप्रतोद अँड. दत्ता बनकर, अविनाश कदम यांच्यात काहीवेळ चांगलीच जुंपली. यामध्ये मालमत्ता वसुली अधिनियम १२७ प्रमाणे प्रस्ताव योग्य असल्याचे बनकर यांनी सांगताच सभागृहाची दिशाभूल करू नका, असे कदम यांनी सुनावले.
You must be logged in to post a comment.