सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेने दोन लाख चार हजार रुपये अखेरची शिल्लक दाखविणारे ३०७ कोटी ४७ कोटी ६६ हजार २०४ रुपयांच्या अंदाजपत्रकाला विशेष सभेने शुक्रवारी विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत मंजूरी दिली . ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी कदम होत्या . यंदाचे अंदाजपत्रक पाणी व घरपट्टीत कोणतीही वाढ न करणारे असल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे .
सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर महसुली भांडवली अनुदानामुळे पालिकेचे बजेट तीनशे कोटीचा टप्पा ओलांडून गेलेला असताना घर व पाणीपट्टी चे नित्वळ उत्पन्न १९ कोटी ७५ लाख रुपयांवर मर्यादित राहिल्याने पालिकेचा खिसा रिकामा होण्याची वेळ आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे . तब्बल दोन तासाच्या ऑनलाईन सभेत चर्चा कमी तांत्रिक त्रुटींचा गोंधळच खूप समोर आला . एकीकडे पालिकेने दोन लाख चारशे चोवीस रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केलेले असताना तब्बल 34 कोटी रुपयांच्या पूर्णतः वसुलीचे मोठे आव्हान वसुली विभागाला पेलावे लागणार आहे .
पालिकेच्या यंदाच्या नफा तोटा ताळेबंदाच्या महसुली अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूला मालमत्ता कर 13 कोटी ७५ लाख , पाणीकर 6 कोटी , विशेष स्वच्छता कर 1 कोटी 20 लाख , अन्निशमन कर 20 लाख , हद्दवाढ क्षेत्रातील महसूल 1 कोटी 75 लाख , इमारत भाडे व खुल्या जागा भाडे 1 कोटी 20 लाख , हातगाडा परवाना फी सत्वीस लाख रुपये , नाट्यगृह भाडे दहा लाख रुपये , विकास कर 3 कोटी , प्रिमियम 2 कोटी , मंडई फी9 लाख रुपये महसुली अनुदाने 34 कोटी 43 लाख , भांडवली अनुदाने 122 कोटी70 लाख दहा हजार असे उत्पन्न अपेक्षित आहे . खर्चाच्या ठळक बाबीमध्ये भांडवली विकास कामे 202 कोटी 78 लाख रुपये , कर्मचारी वेतन भत्ते 23 कोटी23 लाख रुपये , निवृत्ती वेतन15 कोटी 10 लाख रुपये , सातवा वेतन आयोग सव्वातीन कोटी , प्रशासकीय खर्च 8 कोटी 46 लाख 10 हजार , मालमत्तांची देखभाल दुरुस्ती 7 कोटी 98 लाख शिक्षण मंडळ अनुदाने तीन कोटी , शासकीय कर्ज परतफेड 67 लाख रुपये , आरोग्य सुविधा 7कोटी 17 लाख , पाणी पुरवठा सुविधा 3 कोटी 72 लाख , निवडणूक खर्च 1 कोटी 80 लाख रुपये , जयंती कार्यक्रम 40 लाख रुपये , पर्यावरण संतुलन पाच लाख रुपये , पाच टक्के दिव्यांग कल्याणकारी योजना एकोणचाळीस लाख , महिला व बाल कल्याणनिधी 39 लाख रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत . शिलकी अंदाजपत्रक सादर करताना करवसुलीचे मोठे आव्हान आहे .
You must be logged in to post a comment.