सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचविण्यासाठी सातारा पालिकेने अहोरात्र चालणारी सातारा पालिकेने नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे . खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या हेल्पलाईनच्या कामात पुढाकार घेतला आहे.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, सातारा पालिकेने 02162-232686-101 ही नवीन हेल्पलाईन केली आहे. सध्या सातारा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे . दरड कोसळणे, रस्ता खचणे अथवा वाहून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे, इं स्वरूपाच्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशी आपत्ती घडल्यास नागरिकांनी वरील हेल्पलाईनवर संपर्क साधावयाचा आहे . ही संपर्क क्रमांक 24 x 7 सुरू राहणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कळविले आहे.
You must be logged in to post a comment.