सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही ३० एप्रिलपर्यंत सुधारित निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये कोणत्याही सभा घेण्यास मनाई केल्याने सातारा नगरपालिकेची गुरुवारी आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे.
सध्या सातारा शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या उध्दभवलेली आपत्कालीन परिस्थिती प्राधान्याने नियंत्रणात आणण्याची परिहार्यता लक्षात घेता गुरुवार दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहातून व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे आॅनलाईन बोलविण्यात आलेली सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. ही सभा कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर दि. ५ मे रोजी घेण्यात येणार आहे
You must be logged in to post a comment.