सातारा : सातारा शहर आणि वाई, भुर्इंज, पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन टोळीमधील ६ जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबत आदेश काढला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज राजू माने (वय २२) व तेजस संतोष शिवपालक (वय २१, दोघेही रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सदरबझार सातारा) यांच्यावर जबरी चोरी, मारामारी व घफोडीचे गुन्हे दाखल आहेत. यामधील सूरज माने हा टोळीप्रमुख आहे. त्याचबरोबर सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (वय २६) या टोळीप्रमुखासह सागर सुरेश जाधव (वय २४), अक्षय गोरख माळी (वय १९) व सारंग ज्ञानेश्वर माने (वय २२, सर्व रा. गुरेबझार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी वाई) यांच्यावर वाई, भुर्इंज आणि पाचगणी पोलीस ठाण्यात चोरी तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.या दोन्ही टोळीतील सदस्यांवर वारंवार गुन्हे दाखल झाले होते. तसेच अटक करण्यात आली होती. सुधारण्याची संधीही दिली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
You must be logged in to post a comment.