सातारा ( भूमिशिल्प वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून सातारा शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. तसेच वर्षाच्या अखेरी अशाच घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने सातारा पोलिसांनी गुरुवारी रात्री काॅम्बिंग आॅपरेशन राबवले. यात शहरातून हद्दपार केलेल्या आणि वाॅंटेन्ट गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कऱ्हाड व सातारा शहरात घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच ग्रामपंचायत निवडणूक आणि ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा उपविभागीय पोलीस आधिकारी आंजल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काॅम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यात पाच पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, क्युआरटी पथकाचे १५ आणि आरीपी पथकाच्या दहा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी हाॅटेल, ढाबे, रिसोर्ट तसेच शहरातील संवेदनशील वस्तीमध्ये हे आॅपेरशन राबविले. यामध्ये चार यादीवरील आरोपी, १७ माहिती असलेले आरोपी, चार पाहिजे असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात आले. या मोहिमेमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी मदत होणार आहे.
You must be logged in to post a comment.