सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील भरवस्तीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये जुगार अड्डा भरत असल्याचे निष्पन्न झाले असून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५१ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोकड, वाहने, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये जुगार अड्डा भरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सातारा व शाहूपुरी पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह वरदविनायक रेसीडेन्सी भोवती वेडा घातला. पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने अनेकांची पळताभुई एक झाली. अनेकांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे ५१ जण पोलिसांच्या तावडीत सापडले. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत. या सर्वांकडून रोकड, दुचाकी, मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
You must be logged in to post a comment.