सातारा एलसीबीने पकडला ३९ पोती गुटखा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा एलसीबी पथकाने सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्याकडून तब्बल ३९ पोती गुटखा जप्त केला. तसेच सातारा शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना खबऱ्याकडून सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सापळा रचून एक जीप ताब्यात घेतली. त्याच्याकडून जीप, २५ पोती हिरा पान मसाला व १३ पोती राॅयल तंबाखू असा एकूण १० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सातारा शहर व तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!