सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा रंगकर्मी यांच्या वतीने कै. अंजली वामनराव थोरात (थोरात बाई) यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. छोटा आणि मोठा गट अशा दोन विभागात ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देत पुणे, खोपोली, कोल्हापूर, सांगली, मिरज आणि सातारा येथून 48 स्पर्धकांनी आपली दर्जेदार सादरीकरण सादर केली.
हत्तीखाना शाळेच्या माजी मुख्याध्यापिका थोरात बाईंनी सातारकर रंगकर्मींना वेळोवेळी केलेल्या मदतीची फुल ना फुलाची पाकळी या रुपात का होईना उतराई व्हावी या हेतूने थोरात बाईंच्या समरणार्थ या स्पर्धेचं आयोजन स्पर्धेचे प्रमुख आयोजक सचिन मोटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. राजीव मुळ्ये, पंकज काळे आणि अमोल पाटील या मान्यवरांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. पुणे राज्य नाट्य केंद्रावर जगदीश पवार लिखित खानदानी या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मिलिंद वाळिंबे आणि रविना गोगावले यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन शशांक वाडेकर यांनी केले, सचिन मोटे यांनी स्पर्धेविषयी आयोजकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले, बाळकृष्ण शिंदे यांनी आभार मानले. थोरात बाईंच्या सुनबाई सुजाता थोरात आणि कन्या विभावरी शिंदे ह्या कुटुंबासमवेत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. प्रसाद नारकर, जितेंद्र खाडिलकर, संजय मोटे, प्रसाद देवळेकर, ओमकार पाठक यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे लहान गट सांची भोयर (प्रथम), देवदत्त घोणे (द्वितीय), तुलिका आवळे (तृतीय), प्रार्थना गीते (उत्तेजनार्थ प्रथम), अनुष्का अडसूळ (उत्तेजनार्थ द्वितीय), पियुष गावडे (उत्तेजनार्थ तृतीय) तर मोठ्या गटात
केतन गवळी (प्रथम), सचिन आनंदे (द्वितीय), स्नेहा धडवई (तृतीय), कृष्णा देशमुख (उत्तेजनार्थ प्रथम), अंकिता दणाणे(उत्तेजनार्थ द्वितीय), सूरज भोसले (उत्तेजनार्थ तृतीय).
You must be logged in to post a comment.