सातारा आरटीओकडून रुग्णवाहिकांचा भाडेदर निश्चित


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करुन ते परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातारा परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदराचा ठराव अटी व शर्तींसह मंजूर करण्यात आला.

रुग्णवाहिकेचा प्रकार व अंतरानुसार निश्चित करण्यात आलेला भाडेदर पुढीलप्रमाणे

मारुती व्हॅन : 20 किमी अथवा दोन तासांकरिता 350 रुपये तर प्रति किमी 12 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. 24 तासांसाठी 1200 रुपये भाडेदर राहील.
टाटा सुमो आणि मॅटेडोरसदृश वाहने : 20 किमी अथवा दोन तासांकरिता 450 रुपये तर प्रति किमी 13 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. 24 तासांसाठी 1500 रुपये भाडेदर राहील.
टाटा 407, स्वराज मझदासदृश वहाने : 20 किमी अथवा दोन तासांकरिता 550 रुपये तर प्रति किमी 14 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. 24 तासांसाठी 2000 रुपये भाडेदर राहील.
वातानुकुलित वहाने : 20 किमी अथवा दोन तासांकरिता 700 रुपये तर प्रति किमी 20 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. 24 तासांसाठी 3000 रुपये भाडेदर राहील.

रुग्णवहिकेला दरपत्रकात दर्शविलेल्या भाडे दरापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल परंतु निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. तसेच हे भाडे दरपत्रक सर्व रुगणवाहिकांच्या आतील बाजूस लावणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, 20 किमीपेक्षा जास्त अंतर गेल्यास, प्रति किमी भाडे मूळ भाडेदरात वाढ करून आकारण्यात येणार आहे. त्याचसोबत परतीचे अंतरही विचारात घेऊन भाडे आकारावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.
 
 
error: Content is protected !!