पालिकेत स्थायीच्या सभेत तासाभरात ३१७ विषयांना मंजुरी

s

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेची मुदत संपल्याने लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याने साडे चार वर्षांनंतर पहिल्यांदाच सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तब्बल ३१४ विषय ठेवण्यात आले होते. यावर विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर चार विषय रद्द व एक विषय तहकूब करुन ३०९ विषयांना मंजुरी देण्यात आली.

सातारा नगरपालिकेची स्थायी सभा शुक्रवारी आॅनलाईन पद्धतीने पार पडली. स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती स्नेहा नलवडे, विरोधी पक्ष नेता अशोक मोने आदींनी आॅनलाईन उपस्थिती लावली.

या सभेत विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांनी शाहू कला मंदिर, बेंच खरेदी व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाºयांना याची समर्पक उत्तरे देता आली नाहीत.अशोक मोने यांनी नगराध्यक्ष फंडातून तरतूद करण्यात आलेले स्टील बेंच, शाहू कला मंदिराच्या नुुतनीकरणावर केलेला खर्च व आरोग्य विभागाच्या काही विषयांवर आक्षेप नोंदविला. कोरोना व साथरोगांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आरोग्य अधिकाºयांना समर्पक उत्तरे देता आली नाही. दरम्यान, विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांनंतर ३१४ पैकी ४ विषय रद्द करण्यात आले तर एक विषय तहकूब करण्यात आला. उर्वरीत ३०९ विषय सभेत मंजूर झाले.

error: Content is protected !!