सातारा ट्रॅफिक पोलीस ‘राज्यात प्रथम’


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनाच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्याकरीता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा. संदिप भागवत यांचे मार्गदर्शनानुसार वाहतूक विशेष मोहिमेचे नियोजन करुन लॉकडाऊनच्या नियम मोडणारे बेशीस्त वाहन चालकांवर ई – चलन मशीनद्वारे  मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. 

या मोहिमेमध्ये तब्बल 48762 जणांवर  कारवाई करण्यात आली. सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांनी केलेली कारवाई ही महाराष्ट्र राज्यात सरासरीनुसार प्रथम क्रमांकाने अव्वल ठरली आहे.  सहा. पोलीस निरीक्षक  विठ्ठल शेलार व वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कर्मचारी यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली. 

लॉकडाऊनच्या नियंमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता  व   सुरक्षीत  वाहतूकीकरीता  यापुढे  देखील  लॉकडाऊनचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे.

error: Content is protected !!