मतदान प्रक्रियेसंबंधी अफवा पसरवल्यास कारवाई होणार

निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांचा इशारा

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मतदार यादीत deleted शिक्का असल्यास त्या नावाच्या मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. केंद्रावर १७ नंबरचा फॉर्म भरून मतदान करण्याची कोणतीही तरतूद मतदान केंद्रावर होत नसते. मात्र याबाबतचे काही खोटे मेसेज सोशल मीडियावर पाठवले जात आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेसंबंधी कोणीही अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धी माध्यमांना प्रशासनाने दिलेली माहिती अशी की,

“ज्यांची नावे मतदार यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले मतदान कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन तांत्रिक बाबीची पूर्तता करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा”

अशा प्रकारचा फेक मेसेज काही व्हाट्सअप समुहावरून वरून फिरत आहे. तरी सदरचा मेसेज ही निव्वळ अफवा असून यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, तसेच मतदान प्रक्रियेसंबंधी अशा प्रकारच्या अफवा ही कोणी पसरवू नयेत असे आवाहन करून अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सातारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिला आहे.

error: Content is protected !!