ऑक्‍सिजनसाठी कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाॅर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या देशात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला असून अनेक राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. वैद्यकीय उपचारांविना रुग्णांचे जीव जात आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. जिथं ऑक्सिजनवरुन दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

कोल्हापूर ऑक्सिजन नावाची कंपनी राज्यात ऑक्सिजन सप्लाय करते. शुक्रवारी दुपारी या कंपनीचा १५ टन ऑक्सिजन घेऊन एक टॅंकर पुण्याहून महामार्गावरून निघाला. वाढेफाटा येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा टॅंकर सातारा पोलिसांनी थाबंवला. तेव्हा चालकाने हा टॅंकर कोल्हापूरला घेऊन जात असल्याचे आम्हाला सुचना आहेत, असे सांगितले. पोलिसांनी जिल्हाधिकारी शेखऱ सिंग यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांच्याशी खलबते केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर हा टॅंकर क्रांतिसिंह नाना पाटील व जम्बो कोवीड सेंटरमध्ये खाली करण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांमध्यो कोणत्याची स्वरुपाचा वाद नाही, असे स्पष्टीकरण केले

error: Content is protected !!