सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी क्रीडा प्रकारात विविध गटातील स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये साताऱ्यातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण १६ पदके पटकावली. साताऱ्यातील खेळाडूंनी तलवारबाजीत दबदबा निर्माण केला असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
राष्ट्रीय पातळीवरील सब जुनियर, जुनियर, सिनियर, खेलो इंडिया, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी या झालेल्या स्पर्धांमध्ये फेन्सिंग (तलवारबाजी) मध्ये सातारा फेन्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी १६ पदके मिळवली. यामध्ये सृष्टी जाधव, भूषण वरकटे, आर्या पोळ, नूतन वरकटे, अनन्या वरकटे, प्रसाद सणस, साहिल गुर्जर, रोहन पवार, प्रणव पोळ, वेदराज कुंकले, ऋतुराज कुंकले, आदिती वाघमारे, रिद्धी फणसे, योगिता मुंगसे, स्वराली वरकटे, अथर्व वरकटे, कार्तिक वरकटे, शंभूराज फणसे, विघ्नेश जाधव, सुशांत सोनावणे, पियुष केकटे, सखाराम पांढरे, वरद साळी, विरजा साळी या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.