खासदारांच्या आघाडीचा सातारकर १०० टक्के कडेलोट करतील : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : त्यांच्या कारभारामुळे आगामी निवडणुकीत सातारकर सातारा विकास आघाडीचा कडेलोट करतील. त्यांच्या आघाडीचा पलिकेतून कडेलोट होईल. त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे, , अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपाला शिवेंद्रसिंहराजेंनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘मला अलगद आमदारकी मिळालेली नाही, तर तुम्हाला पाडून दहा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येत ती मिळवली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. पालिकेच्या निवडणुकीत ते दोन वॉर्डमधून लढले, पण एकातून पराभूत झाले. ते जर युगपुरूष आहेत तर का पराभूत झाले?

पालिका, आमदारकी, खासदारकी ते पराभूत झाले आहेत. मी मताधिक्क्याने निवडून आलेलो आहे, हे त्यांनी विसरू नये.’’ मुंबईच्या दौऱ्यात त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ते तेथून आल्यावर माझ्यावर चवताळून, चिडून बोलले, एरव्ही ते कुजक्यासारखे बोलतात. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ७० कोटी घालविण्याचे नेमके कारण त्यांनी सांगावे. जुन्या इमारतीत त्यांनी काय दिवे लावले म्हणून नवीन इमारत बांधत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

error: Content is protected !!