सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा शुक्रवार, दि. 7 रोजी निकाल जाहीर झाला. या परिक्षेत सातारा जिल्ह्यातील 53 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (8वी) प्राची देवेंद्र पवार हिने २९८ पैकी २२२ गुण मिळवून जिल्ह्यात ३० वा क्रमांक मिळवला. तर राजनदिनी प्रशांत भोईटे हिने २९८ पैकी २२२ गुण मिळवून जिल्ह्यात ५० वा क्रमांक मिळवला. दरम्यान, या परिक्षेत जिल्ह्यातील एकूण 53 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, हिंदवी स्कूलचे अध्यक्ष व मुख्याध्यापक अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.